अखेर… डवकी संस्थेच्या धानखरेदी केन्द्राचे शुभारंभ

  • देवरीच्या आय.टी.आय.प्रशिक्षण हॉल मध्ये केन्द्राचे उदघाटन.
  • माजी आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाला यश

देवरी १५: शासनाच्या आदेशाप्रमाणे ज्या संस्थेजवळ गोडावून नाही अशा संस्थेनी धान खरेदी करु नये असे सूचना होत्या परंतु देवरी तालुक्यात अनेक संस्थेजवळ गोडावून उपलब्ध नाही. त्यामुळे ते धान खरेदी करू शकत नव्हते. या गंभीर विषयाला धरून माजी आमदार संजय पुराम यांनी शासनस्तरावर व जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी व आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशीक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करुण पुढाकर घेत प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून त्यामुळे अनेक संस्थेला आश्रमशाळेतील भांडार कक्ष व आय.टी.आय चे प्रशिक्षण हॉल धान साठवन्यासाठी प्राप्त झाले यांची प्रचिती म्हणून सोमवार(ता.१४ जून) रोजी डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्थेच्या धान खरेदी केन्द्राचे शुभारंभ देवरी येथील आय.टी.आय.च्या प्रशिक्षण हॉल मध्ये करन्यात आले.

या धानखरेदी केन्द्राचे उदघाटन माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष मेहतरलाल कोराम, यांच्या अध्यक्षतेख़ाली पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुने म्हणून आदिवासी विकास महामंडळ देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री. मुळेवार आणि संस्थेचे उपाध्यक्ष भास्करभाऊ धरमशहारे, संचालक ऋषीकपुर कोरे, रामु परसगाये, जगदीश बावनकर, लक्ष्मण नाईक, संतोष खोटेले व शेतकरी भीमराव बोरकर, रामचंद्र टेंर्भूरकर, सोमा मेळे, अनंतराम सलामे, गोपाल भोयर, कोदूजी लटये, सखाराम मेंढे यांच्या सह डवकी परिसरातील अनेक शेतकरी व संस्थेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक लक्ष्मण नाईक यांनी तर संचालन व उपस्थितांचे आभार संस्थेचे सचीव सुनील औरासे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share