वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी
मुंबई : सध्या कोरोना काळामुळे देशावर तसचं महाराष्ट्रावर देखील आर्थिक संकट आलं आहे. महागाई 6% च्या वर वाढलेली दिसत आहे. त्यामुळे यंदा शासकीय नोकर भरतीत विलंब होताना दिसतोय. महाराष्ट्र सरकारने देखील यावेळेस प्रशासनातील आणि नोकर भरतीत दिरंगाई केलेली दिसत आहे. त्यामुळेच बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं दिसत आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पद भरतीची मागणी केली आहे.
आपल्या मंत्रालयाला स्वतंत्र आस्थापना नाही, सामाजिक न्याय विभागाकडून कर्मचारी उधार घेऊन कारभार करावा लागत आहे, अशी नाराजी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. विनाअधिकारी आणि विनाकर्मचारी खाते कसे चालवायचे? पदे प्रत्यक्षात भरून द्या, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मला आमचा विभाग चालवावा लागत आहे. केवळ मंत्रालयातच आमच्या विभागाची छोटी आस्थापना आहे, पण विभागीय, जिल्हा, तालुका पातळीवर काहीही नाही. माझ्या खात्याला पदे मंजूर केली, पण अद्याप भरलेली नाहीत, असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
दरम्यान, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आले. ते पुन्हा बहाल करायचे तर राज्य शासनाने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे मागणी न करता पत्रकार परिषदेत मागणी केल्यानं आता त्यांच्या नाराजीबद्दल अनेक चर्चा सूरू झाल्या आहेत.