चिचगड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम , सेंद्रिय खत प्रकल्पाची निर्मिती आणि जनजागृती
डॉ. सुजित टेटे
देवरी 14: देवरी तालुकातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड च्या सीमेवर अतिसंवेदनशील , नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ककोडी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत सेंद्रिय खत प्रकल्पाची निर्मिती आणि मार्गदर्शनाचे उपक्रम विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया , अशोक बनकर अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया , यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून पोलीस स्टेशन चिचगड यांच्या सौजन्याने अतिशय प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत नक्षल व आदिवासी बहुल भागातील ककोडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गोंदिया पोलीस दलाकडून “माझी शाळा हरित शाळा ” (Eco Friendly School) पर्यावरणपूरक वातावरण तयार व्हावे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून आधुनिक शेती कडून वळविण्यासाठी आणि रासायनिक खतामुळे होणारे नुकसान टाळून मिश्र शेती व इतर शेतीपूरक उद्योग यांना चालना देण्यासाठी गोंदिया पोलीस दलातर्फे सहानुभूतीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ककोडी जिप शाळेत कम्युनिटीत पोलिसिंग च्या माध्यमातून शेंद्रीय खत प्रकल्प बसवला आणि त्याचा वापर शाळेतील झाडे , नवीन प्लॅन्टेशन याकरिता होणार आहे . सदर प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम सर , अंबादे सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केवट , इतर नागरिक उपस्थित होते .
सदर उपक्रमाची कामगिरी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया , अशोक बनकर अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अतुल तावाडे , पो शि. तांदळे , पो ना. कमलेश सहारे पोलीस स्टेशन चिचगड यांनी केली.