३१ झाडे लावून पर्यावरण मंत्र्याचा ३१ वा वाढदिवस साजरा
देवरी 14- युवासेनाप्रमुख पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांचा ३१ वा वाढदिवस ३१ झाडे लावून साजरा करण्यात आला. सौ. करुणा कुर्वे जिल्हा संघटक, शिवसेना महिला आघाडी, गोंदिया यांचे नेतृत्वात युवाहृदयसम्राट आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आशूतोष महाराज यांचे आश्रम परिसरात ३१ झाडे लावून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
वृक्षारोपणाच्या वेळी शिक्षक सेनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे, तालुका संघटक सौ. प्रिती उईके. तालुका उपसंघटक सौ. प्रिती भांडारकर, सलमा पठान, भारती गुप्ता, कमरुनिशा सैय्यद, कल्पना गुप्ता, दिपा चंदेल, बंटी गुप्ता, बाली मुलकलवार, कविता गुप्ता,लतीफा पठान, जायदा सैय्यद, परवीन शेख, नलू मेश्राम, अनिता साखरे, प्रमिला कावळे शेखर गुप्ता, विजय गुप्ता, गणेश चंदेल, विजय गुप्ता, शेखर गुप्ता, मुस्ताक सैय्यद, राजू गुप्ता इत्यादी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी लावलेल्या ३१ झाडांचे संगोपण करुन त्यांना जगविण्याचा निश्चय करण्यात आला. जिल्हा संघटक सौ.करुणा कुर्वे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले.