डॉक्‍टरांची 18 जूनला देशव्यापी निदर्शने

नवी दिल्ली  – इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्‍टरांच्या प्रमुख संघटनेने 18 जूनला देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात विविध ठिकाणी डॉक्‍टरांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या. त्यांच्या निषेधासाठी डॉक्‍टर निदर्शने करणार आहेत. मात्र, निदर्शनांमुळे रूग्णसेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. सर्व डॉक्‍टर कामावर रूजू असतील. डॉक्‍टर केवळ काळ्या रंगाच्या फिती, मास्क, शर्ट परिधान करून निषेध व्यक्‍त करतील, असे आयएमएकडून स्पष्ट करण्यात आले.

डॉक्‍टरांचे रक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्या संघटनेने केली आहे. याआधी आयएमएने ऍलोपथीविषयी प्रतिकूल टिप्पणी केल्याबद्दल योगगुरू रामदेवबाबा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. आता त्या संघटनेने डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share