देवरीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली 9 कुटुंबांना 45 हजार रुपयाची मदत

डॉ. सुजित टेटे:
देवरी 13: कोविड विषाणूच्या संसर्गामुळे घरचा कुटुंब प्रमुख दगावल्याचे दुःखाचे डोंगर उभे असलेल्या अनाथ कुटुंबाना देवरीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी छोटीसी मदत करून अनाथांना मदतीचा हात दिलेला आहे. यामुळे देवरी प्रशासकीय विभागाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

नुकतेच मरामजोब, टेकाबेदर आणि देवरी येथे प्रशासकीय अधिकारी यांचे मार्फत 8 कुटुंबांना प्रत्येकी 5000 रू ची मदत करण्यात आली असून एक कुटुंब गोंदिया येथील आहे.
असे एकूण 9 कुटुंबांना 45000 रू वाटप करण्यात आले असल्याची माहिती देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी माध्यमांना दिली.

जागतिक कोरोना महामारीच्या काळात कोरोनामुळे कुणाचे पती-पत्नी,आई -वडील,मुले गमावली त्यांच्याप्रती सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे. नेमकी ही सहृदयता गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश खवले आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी दाखवत देवरी तालुक्यात कोरोनामुळे जीव गमावलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन अर्थासहाय्यता,अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहेत. नुकतेच देवरी तालुक्यातील मरामजोब, टेकाबेदर आणि देवरी येथे प्रशासकीय अधिकारी यांचे मार्फत 8 कुटुंबांना प्रत्येकी 5000 रू ची मदत करण्यात आली असून एक कुटुंब गोंदिया येथील आहे. असे एकूण 9 कुटुंबांना 45000 रू वाटप करण्यात आले

तालुका प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे याचा प्रत्येय येत आहे या स्तुत्य उपक्रमाबद्दल गोंदिया चे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे आणि तालुका प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

Share