शिक्षक सेनेची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर – अनिल कुर्वे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती


देवरी 12- शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष माननीय ज. मो. अभ्यंकर यांचेद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली.


महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती के.एस.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे उच्च माध्यमिक शिक्षक अनिल कुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्याध्यक्ष पदावर गणेश भदाडे, सरचिटणीस पदावर चेतककुमार झंजाळ, कोषाध्यक्ष पदी कु. प्रज्ञा वैकुंठी, उपाध्यक्ष पदावर राजेश राहांगडाले, खुशाल पेशने, दिलीप वंजारी आणि राकेश पुस्तोडे, सचिव पदी दयानंद चाटे, सहसचिव पदी देवानंद भोयर, प्रदीपसिंग बट आणि गौरीशंकर राहंगडाले यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी सदस्यामध्ये प्रमोद पेटकर, टागेशकुमार बावने, महिंद्र अहिरकर, प्रकाश वानखेडे, प्रेमशोब बोरकर, प्रविण पारधी, त्र्यंबककुमार परशुरामकर, प्रदिप पटले आणि लक्ष्मण मेश्राम यांचा समावेश आहे.


शिक्षक, विद्यार्थी व समाजाच्या हितासाठी काम करून आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय ज.मो. अभ्यंकर साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून जी मला जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडेन व त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही असे मत नवनियुक्त शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त करून प्रांताध्यक्ष माननीय ज.मो. अभ्यंकर आणि विभागीय अध्यक्ष माननीय गंगाधर नाकडे यांचे आभार व्यक्त केले. देवरी येथे अनिल कुर्वे यांचा शिक्षक सेंनेकडून सत्कार करण्यात आला. शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष गंगाधर नाकाडे, शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख सुरेन्द्र नायडू, युवासेना गोंदिया जिल्हाध्यक्ष कगेश राव, शिक्षक सेनेचे देवरी शहरप्रमुख सुभाष दुबे आणि गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना व शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि समस्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून भविष्यातील उज्वल वाटचालीबद्दल शुभेछा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share