शहिद बिरसा मुंडा यांच्या स्मृतीनिमित्त अभिवादन

देवरी 10: देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथे बिरसा मुंडा यांचे स्मृती दिन साजरा करून अभिवादन करण्यात आले.

झारखंड राज्यात रांचीच्या ऊलीहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरसा यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी होती. इंग्रज आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत, अशी त्यांची भावना होती. त्यातून त्यांनी आदिवासी समाजातील लढवय्या युवकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 1897 ते 1900 या काळात इंग्रज सैनिक व आदिवासी यांच्यात युद्ध झाले. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांच्याकडे होते. आदिवासी बिरसा यास धरती बाबा या नावाने ओळखले जात होते. 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा व त्यांच्या साथीदारांना अटक झाली. रांची येथील कारागृहात 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडांचे निधन झाले. तेव्हापासून बिरसा मुंडा यांचा स्मृतीदिन साजरा केला जातो.

यावेळी भोई साहेब,
प्रा.मधुर दिहारी , नितेश वालोदे,
विलास येल्ले,देवानंद नाईक ,विकास घासले ,हाकेश धानगाये,मंगेश वालापुरे,अंकित नंदागवळी, मोरेश्वर दिहारि ,प्रमोद दिहारी , अनिलभाऊ कोल्हारे ग्रा.प. सदस्य, केसरजी दिहारी पुंजारी, पंढरी येल्ले, अस्विन बारसागडे,जयेश दिहारी,राजेश खाडवाये आदी उपस्थित होते .

Print Friendly, PDF & Email
Share