आमच्या मालकीची शेती आमदार कोरोटे यांना विकली
?शेती मालक उइके कुटुंबियांकडून स्पष्टीकरण
?कवडी येथील शेती खरेदी विक्री प्रकरण
प्रतिनिधी / देवरी 11: सालेकसा तालुक्यातील कवडी येथील शेती खरेदी-विक्री प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे. या प्रकरणात आमदार सहषराम कोरोटे यांच्या कडून काही लोकांवर अन्याय झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या प्रकरणात गुरुवार(ता.१० जून) रोजी कवडी चे सदर शेतीचे खरे मालक पिपरिया येथील उईके कुटुंबीय देवरी येथे येवून स्पष्टीकरण दिले. यात त्यांच्या मते कवडी येथील १७.५० एक ही वडिलोपार्जित शेती आमची मालकीची आहे. ही शेती कवडी येथील काही लोकांना अधई-बटई वर फक्त दिले होते. परंतु त्यांच्या कडून आम्हाला धान किंवा इतर प्रकारची कोणतीही मदत मिळत नव्हती. अशा परिस्थित आमच्या एका मुलाला किडनी चे आजार झाले. आणि घरी लग्न सोहळा असल्याने आम्हाला पैसेची अत्यंत गरज होती. त्यामुळे आम्ही सदर शेती विकण्यास काढले. घेणाऱ्याची इतरत्र शोध घेतला . आम्ही आदिवासी असल्याने गैर आदिवासी ला विकु शकत नव्हतो. नंतर आमदार कोरोटे साहेबांशी संपर्क केला. आमच्या आर्थिक अडचणी व समस्या आमदार साहेबांना सांगीतले. पूर्वी ते तैयार झाले नव्हते . आम्ही दोन तीन वेळा त्यांना भेटून आमच्या समस्या मार्गी लावण्याची विनंती केली .तेव्हा ते आमची शेती घेण्यास तैयार झाले. मे महिन्यात आमच्या मालकीची शेती आम्ही आमदार कोरोटे साहेबांना विकली ” असे जमीन मालकांनी म्हटले आहे .
यावेळी पिपरिया चे उइके कुटुंबीय यात पुष्पाबाई ईश्वर उइके, जितेंद्र ईश्वर उइके, भागनबाई देवेन्द्र उइके, नीरज संतोश उइके यांनी पुढे सांगितले की, आमची वडिलोपार्जित ४०-५० वर्षापासून १७.५० एकड़ शेती कवडी येथे आहे. आमची मालकीची शेती असल्याने शासनाकडून मिळणारी सर्व मदत आम्हालाच मिळत आहे. आम्हाला पैसेचे अत्यंत गरज असल्याने आम्ही ही शेती आमदार सहषराम कोरोटे व दीपक सहषराम कोरोटे यांना विकली. परंतु या प्रकरणात कवडी येथील काही लोक ही शेती आमची आहे. आम्हाला न विचारता ही शेती खरेदी करुण आमची फसवणूक करुण आमच्यावर अन्याय केला आहे. असा आरोप लावून आमदार कोरोटे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करित आहे. ही गोष्ट चूकीची असून आमदार साहेबांनी कोणावर ही अन्याय न करता आमच्या मालकीची शेती विकत घेवून त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले. असे स्पष्टीकरण उइके कुटुंबियांनी देवरी येथे दिले.