धक्कादायक…! लाखनी तालुका असुरक्षित?

तहसीलदार मल्लिक विराणी यांनी घेतली राजेगाव मोरगाव भेट
४० रुग्ण पॉझिटिव्ह

अजिंक्य भांडारकर/ प्रहार टाईम्स

लाखनी ३: तालुक्यातील राजेगाव मोरगाव या खेडेगावात 36 आणि 4 असे एकूण 40 रुग्ण एकाच दिवशी आढळून आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आज मलिक विराणी तहसीलदार लाखणी आणि डॉक्टर शेखर जाधव आणि त्यांच्या प्रशासकीय टीमने राजेगाव आणि मोरगाव या दोन्ही खेडेगावाच्या दौरा केला असता खेडेगावात कोरोना शिरकाव झाल्यामुळे प्रशासनाच्या मार्फत चिंता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही गावांना आता कंटेनमेंट झोनमध्ये टाकण्यासाठी प्रस्ताव तयार केले गेले असून नागरिकांनी सुरक्षित अंतर मास्क आणि वेळोवेळी हात धुणे हे करणे गरजेचे आहे. तालुक्यातील या दोन्ही गावात चाळीस रुग्ण आढळल्याने आता लाखणी तालुका किती सुरक्षित आहे त्याची चिंता प्रशासनाला वाटू लागली आहे. यावेळी लाखणी तहसीलदार मलीक विराणी, डॉक्टर शेखर जाधव, नरेश नखरे आणि प्रशासकीय अधिकारी मोरगाव आणि राजेगाव या दोन्ही गावांना भेटी दरम्यान उपस्थित होते.

तालुक्यासाठी हा इशारा समजण्यासारखा आहे नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून आणि अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. बाहेर पडत असताना मास्क वापरणे आवश्यक आहे. वेळोवेळी हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जंतू नाशक रसायनांचा वापर करून स्वच्छ ता बाळगावी असे आवाहन लाखणी तहसीलदार मलिक विराणी यांनी केले आहे.

Share