नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही- शरद पवार

मुंबई : ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचं काय होईल अशा प्रश्न विचारला जात होता, त्याचप्रमाणे शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय भविष्य असेल, असे प्रश्न कार्यकर्ते विचारत असतात, त्यांच्या या प्रश्नाला आता खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सलग पंधरा वर्ष आपण सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झाले. त्या आधी त्यांचं कर्तृत्व कधी दिसलं नाही, पण आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवले होतो. त्यावेळी अनेकांनी शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहे. शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. तर महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आपण महाराष्ट्रातील लोकांना महाविकास आघाडीचा पर्याय दिला, त्यावर विश्वास ठेऊन लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाची स्तुती शरद पवार यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share