World Brain Tumor Day 2021: डोकेदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

नवी दिल्ली : ब्रेन ट्यूमर एक असा आजार आहे ज्यामध्ये मेंदूतील पेशी असामान्य प्रकारे वाढू लागतात. ज्या खुप भयंकर स्थिती निर्मण करतात. हळुहळु मेंदूत टिश्यूजची गाठ बनते, ज्यास ब्रेन ट्यूमर म्हटले जाते. या आजाराचे निदान झाल्यानंतर रूग्ण स्ट्रेस घेतो जे आणखी धोकादायक ठरते.

किती प्रकारचे असतात ब्रेन ट्यूमर?

1. बिनाईन ट्यूमर –याची वाढण्याची गती संथ असते आणि हा मेंदूच्याच पेशींनी बनतो.

2. मेलिग्नेंट ट्यूमर –यामध्ये ट्यूमरची वाढ वेगाने होते. ज्यामुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

1. झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर आणि इतर वेळेही डोकेदुखी होणे.
2. स्मरणशक्ती प्रभावित होणे.
3. अस्वस्थ वाटणे.
4. फोकस करण्यास त्रास होणे.
5. मिरगीचे झटके येणे, कमजोरी, शरीर सुन्न होणे.
6. दृष्टीवर परिणाम होणे.
7. तणाव आणि डिप्रेशन.
8. आवाजात बदल होणे.
9. कमी ऐकू येणे.
10. मसल्समध्ये कमजोरी.

टेस्ट आणि उपचार

ब्रेन ट्यूमरच्या उपचारासाठी डॉक्टर संबंधीत व्यक्तीला क्रेनियल नर्व्ह टेस्ट करण्यासाठी मेंदूचा एमआरआय, अँजियोग्राफी, डोक्याचा एक्सरे आणि बायोप्सी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. ब्रेन ट्यूमरसाठी सर्जरी आवश्यक असते. यासाठी अनेक अशा टेक्निक डेव्हलप झाल्या आहेत ज्यांचा उपचार खुप सोपा झाला आहे.

ब्रेन ट्यूमरची कारणे

– 20 ते 40 वयाच्या लोकांमध्ये जास्त करून नॉन कॅन्सर आणि 50 वर्षांच्या वरील लोकांना कॅन्सरचा ट्यूमर होण्याची शक्यता जास्त असते.

– नॉन कॅन्सर ट्यूमर वाढण्याचा स्पीड, कॅन्सरवाल्या ट्यूमरच्या तुलनेत संथ असतो.

– तरीसुद्धा तुमच्या डोक्यात सतत वेदना होत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता एकदा डॉक्टरांशी आवश्यक कंसल्ट करा.

Print Friendly, PDF & Email
Share