खुशखबर! ‘हा’ अपवाद वगळता प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

मुंबई : गावी जाण्यासाठी ई-पासची गरज भासत होती. मात्र आता येत्या सोमवारपासून ई-पासची गरज भासणार नाही. 23 मार्चपासून सुरू केलेला लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी आवश्‍यक केलेल्या ई-पास आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांना जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास मुभा असणार आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच ई-पास रद्द केल्याबाबतचा आदेश काढला होता. मात्र राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ई-पासला रद्द करण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र नागरिकांच्या सततच्या मागणीवरून राज्य सरकाडरने नवीन नियमावलीत ई-पास रद्द कऱण्यात आला आहे. मात्र याला एक अपवाद आहे.

अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. म्हणजेच पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुम्हाला थांबायचं असेल तर तुमच्याकडे ई-पास असणं गरजेचं असणार आहे. मात्र सध्यातरी राज्यातील कोणतंही शहर पाचव्या गटात नाही त्यामुळे आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही.

दरम्यान, अत्यावश्‍यक कारणासाठी प्रवास करण्याची गरज असणाऱ्या नागरीकांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. नागरीकांना वैद्यकीय व कुटुंबातील सदस्याचा मृत्यु या दोन कारणांसा प्रवासाला परवानगी दिली जात होती.

Share