Breaking : सह्याद्री अतिथीगृहातील मोठा स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
मुंबई : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.