घरकुलांची राशी व जमिनीचे पट्टे मिळत नाही तो पर्यन्त स्वस्थ बसणार नाही-आ.सहषराम कोरोटे
तालुका प्रतिनिधी/ प्रहार टाईम्स
देवरी २: केंद्र सरकारने येथील लोकांना पाच वर्षापासून फक्त लॉलीपॉप देवून ठेवले आहे. त्यांनी येथील लोकांचे घर बांधन्याचे स्वप्न भंग करण्याचे काम केले आहे. यामुळे येथील लोक कर्जबाजारी झाले आहेत. यात लोकांना घरकुलाची मंजूरी मिड़ाली पण पैसे मिड़ालेले नाही. जे लोक घरकुलाचे पात्र आहेत अशांना जामिनीचे पट्टे नाही. त्यामुड़े त्यांना घरकुल मिड़त नाही. घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाने पहिला हप्ता दिला परंतु जे केंद्र सरकार कडून दिड लाख रूपयाचा थकित हफ्ता मिड़ायला पाहिजे होता. तो वारंवार मागणी व पाठपुरावा करुन सुद्धा अजून पर्यन्त केंद्र सरकार कडून घरकुल लाभार्थ्यांना थकित निधि मिड़ालेली नाही. कर्ज बाजारी झालेल्या घरकुल धारकांची नोटबन्दी व जी.एस.टी. प्रमाणे फसवणूक करू नका. मी सर्व घरकुल लाभार्थ्यांना आश्वासन देउ इच्छिते की जो पर्यन्त आपणास मंजूर घरकुलाची थकित राशि व पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे मिड़त नाही तो पर्यन्त काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व मी स्वस्थ बसणार नाही. असे प्रतिपादान आमदार सहषरामभाऊ कोरोटे यांनी केले.
ते देवरी तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने देवरी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना थकित रक्कम व पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे त्वरित देण्याची मागनीला धरुन काढण्यात आलेल्या देवरी नगरपंचायत कार्यालयावर धड़क मोर्च्यात बोलत होते.
हा मोर्चा आज सोमवारी (ता.02 नोव्हेंबर) रोजी आमदार कोरोटे यांच्या नेतृत्वात देवरी येथील पटाच्या दानीपासुन शहरातील प्रमुख मार्गे भ्रमण करीत देवरी नगरपंचायतवर काढण्यात आला. देवरी नगरपंचायत कार्यालयासमोर या मोर्च्याचे रूपांतर सभेत करण्यात आले. या सभेत आमदार सहषरामभाऊ कोरोटे, देवरी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संदीप भाटिया, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे, नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया, युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष बबलू कुरैशी, शहराध्यक्ष कुलदीप गुप्ता, तालुका महासचिव बड़ीराम कोटवार, प्रशांत कोटांगले, वरिष्ठ कार्यकर्ता ऍड प्रशांत संगीड़वार,परमजीत सिंग भाटिया, जैपाल शहारे, रोशन भाटिया, राजेश गहाने, टी.डी. वाघमारे, नरेश राऊत, कमलेश पालीवाल, सुभद्रा अगड़े यांच्या सह देवरी शहरातील घरकुल मंजूर लाभार्थी, पात्र लाभार्थी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेननंतर देवरी नगरपंचायत चे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना आमदार व काँगेस पक्षाच्या शिष्टमंडड़ाने आपल्या मागनीचे निवेदन सादर केले. तसेच नंतर आमदार कोरोटे यांच्या सोबत एका शिष्टमंडड़ाने देवरी चे उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा मागनीचे निवेदन सादर करुण सदर मागणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.
या मोर्च्याचे प्रास्तावीक तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी तर संचालन नगरसेवक ओमप्रकाश रामटेके यांनी आणी उपस्थितांचे आभार तालुका महासचिव बड़ीराम कोटवार यांनी मानले.