देवरीची कोरोनामुक्ती कडे वाटचाल, गोंदिया जिल्हात 60 पॉझिटिव्ह 29 बरे,
देवरी तालुक्यात फक्त 3 सक्रिय रुग्ण, लवकरच देवरी कोरोना मुक्त…!
गोंदिया,दि.02 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 02 रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत 40,800 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39,769 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 341 आहे.232 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 690 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.47टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे .