गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..!

सततच्या महागाईने पिचलेल्या नागरिकांसाठी अखेर एक ‘गुड न्यूज’ आली आहे. ती म्हणजे गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या दिवशी (ता.1) भारतीय तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅसचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार राजधानी दिल्लीत 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 123 रुपयांची घट करण्यात आली आहे.

विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. हा सिलिंडर तुम्हाला जुन्या किंमतीतच मिळणार आहे. नवी दिल्लीत अनुदानित गॅस सिलिंडरची सध्याची किंमत ही 809 रुपये, तर व्यावसायिक 19 किलो गॅस सिलिंडर आता 1473.5 रुपयांना मिळणार आहे.

विनाअनुदानित गॅसचे दर
दिल्ली…………809.00 रुपये
मुंबई……………809.00 रुपये
कोलकाता…….835.50 रुपये
चेन्नई………….825.00 रुपये

व्यावसायिक गॅसचे (19 किलो) घटलेले दर नवी किंमत
दिल्ली……… 122 ……1473.5 रुपये
कोलकाता….123 …….1544.5 रुपये
मुंबई………..122.5 ….1422.5 रुपये
चेन्नई………122.5 … 1603 रुपये

सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर दरमहा एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर होतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर तुम्हाला आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत समजू शकते.

Share