गोंदिया 23 तर भंडारा 90 नवीन कोरोना रुग्ण

भंडारा, 01- जिल्ह्यात आज 60 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 56815 झाली असून आज 90 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 58855 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 टक्के आहे.आज 1585 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 90 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 87 हजार 938 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 58855 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 02, मोहाडी 11, तुमसर 02, पवनी 01, लाखनी 09, साकोली 64 व लाखांदुर तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 56815 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 58855 झाली असून 986 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1054 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.79 टक्के एवढा आहे.

Print Friendly, PDF & Email
Share