गावविकासावर परिणाम : भ्रष्टाचारासाठी मोकळी वाट

नागपूर, दि.०१ जून: राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी आली नाही. परिणामी जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा वर्षभरापासून न असल्याने गावाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे. आराखडा मंजूर होऊन पडला आहे. 

शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षांत किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपले तरी एकही ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे. लाभार्थी निवड खोळंबली आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होते याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. 

एकही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनचे लाभार्थी निवडता आले नाही. १५ आॅगस्ट च्या ग्रामसभेत मंजूर केला जातो. पण एकही ग्रामसभा झालीच नाही. योजनेतून गावात कुठे – कुठे विकास कामे करायची यावर चर्चा होऊ शकली नाही. पंचायत समितीत्याकडे प्रस्तावित कामाचा आराखडा सादर करायचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे.

Share