लाचखोर सरपंच-उपसरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

१,१०,००० रक्कम स्वीकारल्याचा गुन्हा दाखल


चामोर्शी : तालुक्यात येत असलेल्या नेताजीनगर ग्रामपंचायतीत नाली, सिमेंट काँक्रीट रास्ता आणि बंधारा बांधकामाचे देयक रक्कम २२,००,०००/- रु. धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २,२०,०००/- रुपये तक्रारदाराकडून मागणी केली. नेताजीनगर ग्रा.प. सरपंच नगेन पाल वय ५२ आणि उपसरपंच संजीत कांचन भट्टाचार्य वय ३५ वर्ष यांनी पूर्ण झालेल्या कामाचे बिल कंत्राटदाराला देण्यासाठी २,२०,०००/- रुपये मागणी केली दरम्यान तडजोड झाल्यानंतर १,१०,०००/- रक्कम देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली असता सापळा रचून नेताजीनगर ग्रा.प. सरपंच नगेन पाल वय ५२ आणि उपसरपंच संजीत कांचन भट्टाचार्य वय ३५ वर्ष यांना रंगेहात पकडण्यात आले.

सदर आरोपींवर कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सरपंच आणि उपसरपंच गावातील एक जबाबदारीचे पद असून काही पैशाच्या लालसापोटी जर आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचे आर्थिक फायदा घेत असल्यास याची माहिती लाचलुचपत विभागाला देण्यात यावी जेणे करून भ्रष्ट अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक सुरेंद्र गरड, पोहवा नत्थू धोटे, नापोशि सतीश कात्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोशि महेश कुकुडकर चापोशि घनशाम वडेट्टीवार आधी लाच लुचपत विभाग गडचिरोली च्या कर्मचाऱ्यानी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share