बिग बॉस १५ कार्यक्रमात कोण होणार सहभागी?
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस. बिग बॉसच्या १५ व्या पर्वामध्ये कोण कोण कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याचा अंदाज लावला जाऊ लागला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांची नावे स्पर्धक म्हणून पुढे आली आहेत. या दोघींशिवाय अन्य काही कलाकारांची नावे ही पुढे आली आहेत. मात्र, या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याने त्याची अधिकृत घोषणाही झालेली नाही. बिग बॉस १४ जेव्हा संपले तेव्हा १५ पर्वामध्ये प्रेक्षकांना काही तरी नवीन बघायला मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
बिग बॉसच्या १५ व्या सिझनमध्ये रिया चक्रवर्ती, दिशा वकानी यांच्याशिवाय अनुषा दांडेकर, पार्थ समथान, सुरभी चंदना, कृष्णा अभिषेक, मोहसिन खान, निया शर्मा यांच्याशी ही संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे. रिया चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर खूपच वादग्रस्त ठरली होती. तसेच बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये राहुल वैद्यची गर्लफ्रेंड दिशा परमार हिचे नाव ही स्पर्धक म्हणून समोर येत आहे. या कार्यक्रमाच्या पुढच्या सिझनमध्ये कलाकारांसोबत काही सर्वसामान्य लोकांनाही स्पर्धक म्हणून सहभागी करून घेणार असल्याची घोषणा सलमान खानने केली होती. बिग बॉसच्या आगामी पर्वामध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा नवरा विवेक दहिया यांची नावे देखील स्पर्धक म्हणून चर्चेच आली आहेत. बिग बॉस १५ च्या घरामध्ये मध्ये निया शर्मा देखील स्पर्धक म्हणून दिसू शकते.
या सर्व कलाकारांसोबतच आणखी एक नावाची स्पर्धक म्हणून जोरदार चर्चा आहे. हे नाव आहे, अभिनेता गोविंदा यांचा भाचा कृ्ष्णा अभिषेक याचे. हा देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असलेली ‘नागिन ५ ‘ मधील अभिनेत्री सुरभी चंदना देखील या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. बालिका वधू मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा मर्दाने देखील बिग बॉस १५ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे.