महाराष्ट्रात आणखी 15 दिवस निर्बंध राहणार- उद्धव ठाकरे यांची घोषणा

“महाराष्ट्रात पुढील 15 दिवसांसाठी (15 जूनपर्यंत) निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. तसेच “कोरोनामुक्त गाव’ योजना राबविणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “तौक्ते चक्रीवादळाची मिनिटा-मिनाटाला माहिती घेतली. किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची गरज आहे. वादळामध्ये वीज खंडित होते. झाडे उन्मळून पडतात. या गोष्टीचा विचार करुन विजेचा पुरवठा भूमीगत करावा लागेल. तसेच काही घरे भूकंपरोधित बांधावे लागतील. याबाबत केंद्र सरकारशी बोलणे सुरु केले आहे. मला खात्री आहे केंद्र आपल्याला या बाबतीत मदत करेल.”

“ऑक्सिजनची गरज मध्यंतरी वाढली होती. उद्योगांचा ऑक्सिजन मागवुनही टंचाई जाणवत होती. आता काळी बुरशी आली आहे. राज्यात म्युकर मायकोसिसचे 3000 हजार रुग्ण आहेत. बालरोगतज्ज्ञाचे टास्क फोर्स तयार केले आहेत,” असे ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले, की “45 वर्षावरील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतली आहे, तर 18 ते 44 वर्षावरील नागरिकांची जबाबदारी राज्याची आहे. जूनपासून लस पुरवठा वाढणार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत सव्वा दोन कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.”

दहावीच्या परीक्षा न घेता मुल्याकंन करणार आहोत. बारावीच्या परिक्षेबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. मात्र, याबाबत केंद्रानेही देशासाठी एकच धोरण घेतले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलू.

महत्वाचे मुद्दे

कोरोनामुक्त गाव मोहीम राबविणार. त्यासाठी पोपटराव पवार यांच्याशी चर्चा करू.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे करताना कोरोनाची बंधने पाळा.

कोरोनात अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी केंद्राने योजना जाहीर केली आहे. या बालकाचे पालकत्व सरकार घेईल. या बालकांसाठी लवकरच योजना जाहीर करू.

याचबरोबर ”ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती. या लाटेत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत. यापुढे मात्र असं होऊ देता कामानये. करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच पालकत्व राज्य सरकार घेणार. त्यांना आम्ही अनाथ होऊ देणार नाही. याबाबत योजना तयार केली जात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील निर्बंध नाइलाजाने पुढील १५ दिवस म्हणजे १५ जूनपर्यंत वाढवावे लागत आहे. नुसते निर्बंध वाढवत नाही आहोत, तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन, काही जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यात हे निर्बंध आपण थोडेफार शिथील करू शकू. मात्र निर्बंध जरी शिथील होत असले तरी धोका टळला असं समजू नका” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Print Friendly, PDF & Email
Share