सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देवरीतर्फे लसीकरण जनजागृती

देवरी 30: कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थे अंतर्गत छत्रपती शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलीटेक्निक) देवरी च्या वतीने covid-19 लसीकरणावर जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रीती नेताम तसेच संगणक अभियांत्रिकी व्याख्याता विक्की चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

देशात तसेच राज्यात कोरोना विषाणू च्या वाढल्या प्रादुर्भावाला आडा घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात असून ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने सदर जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून यामध्ये उत्साहाने सर्व विद्यार्थ्यांनी मास्क वाटप करुण जनजागृती केली व त्याचा फायदा गावागावातील लोकांना होईल व लस घेऊन सर्व नागरिक कोरोणावर मात करावी अशी जनजागृती करण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये संस्थेचे अध्यक्ष झामसिंगजी येरणे, सचिव अनिलजी येरणे व प्राचार्य अशीषसिंगजी खतवार यांनी सहकार्य केले. रक्षा रामटेके, पूजा यावलकर, खुशबू दसरिया, पल्लवी दखणे, रितेश पद्मे ,आकाश पुरी आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Share