जिल्हा निधीतून बियाने व किटकनाशके उपलब्ध करा – माजी पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम

प्रहार टाईम्स| भुपेंद्र मस्के

देवरी: नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील बहुसंख्य जनता हि शेती ह्या एकमात्र व्यवसायावर अवलंबून आहे. चालू वर्षात कोरोना परिस्थितीमुळे रोजगाराअभावी उपासमारीची वेळ क्षेत्रातील जनतेवर आली आहे.

दरवर्षी जिल्हा निधीतून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. बियाणे, रसायने, किटकनाशके व शेतीपयोगी साहित्य हे ५० टक्के अनुदानावर डिबीटी तत्त्वावर देण्यात येत होते.

मात्र चालु वित्तिय वर्षात सदर तरतुद न केल्यामुळे हि योजना राबविली जाणार नसल्याची माहिती आहे. कदाचित लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हि वेळ आली असल्याने कुणी आवाजही उचलला नाही. व जिल्हा परिषद प्रशासकाकडुन लोककल्याणकारी योजनेला मुठमाती देण्यात आली.

जनतेला बियाणे, रसायने किटकनाशके, व शेतीपयोगी साहित्य अनुदान तत्वावर वाटप करण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे माजी प.स सदस्य अर्चना रमेश ताराम यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेकडून अजूनपावेतो सदर योजना अंमलबजावणी करिता कुठलेही पत्र आले नाही.त्यामुळे योजनेसंदर्भात काही जास्त बोलता येणार नाही

  • प्रमोद कागदीमेश्राम
    कृषी अधिकारी, प.स देवरी
Print Friendly, PDF & Email
Share