?’भंगार ऍम्बुलन्स’ मुळे देवरीवासी भोगतात नरक यातना…!
♦️तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला लागले ग्रहण
♦️एकाच आठवड्यात दोन ऍम्बुलन्स अपघातग्रस्त
डॉ. सुजित टेटे/प्रहार टाईम्स
देवरी 27: आदिवासी बहुल आणि नक्षल भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यात नेहमीच समस्यांचे डोंगर उभे असते. समस्या च्या समाधानाची येथील मागासवर्षीय आदिवासी लोक मागणी करतात परंतु नेहमीच त्यांना डिचवल्याचे असंख्ये प्रकरण आता पर्यंत समोर आलेली असतांना आरोग्य विभागाचे धिंडोरे उडवणारे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
मागील वर्षीपासून देशात कोरोनाची साथ असतांना आरोग्य विषयक सोयी सुविधा भक्कम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने युद्ध स्तरावर प्रयत्न केले परंतु मागासलेल्या देवरी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या 4 ऍम्बुलन्स 13-14 वर्ष जुने असून सद्या भंगार स्थितीत आहेत. भंगार झालेले ऍम्बुलन्स मुल्ला , फुटाणा , ककोडी , घोनाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या असून आरोग्य विभाग चक्क ग्रामीण भागातील रुग्णांचे आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या काळात अत्याधुनिक सोयी सुविधा तर दूर रुग्णांना ने आन करणाऱ्या ऍम्बुलन्स भंगार झाल्याने तालुक्यातील लोकांनी अजून काय काय सहन करावा असा सवाल उपस्थित होत आहे. देवरी तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्ण गोंदियाला हलविले जातात त्यातच भंगार झालेल्या ऍम्ब्युलन्स मुळे रस्त्यात कधी अपघात होऊ शकतो हे नाकारता येत नाही.
Breaking News: देवरी येथील रुग्णवाहिका नाल्यात कोसळली 4 जखमी
Breaking News: ऍम्ब्युलन्स च्या धडकेत वृद्ध जागीच ठार ….
सदर ऍम्बुलन्स बद्दल आमच्या प्रतिनिधीनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित कुकडे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता 4 ऍम्ब्युलन्स भंगार झाले असल्याचे सांगतले आणि नवीन ऍम्बुलन्स साठी मागणी केली असल्याची माहिती दिली.
मागणी केली असून सुद्धा 13-14 वर्ष जुने भंगार ऍम्बुलन्स का चालत आहेत ? आणि नवीन ऍम्ब्युलन्स का मिळाले नाही ? सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देवरी तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांनी नवीन ऍम्ब्युलन्स बद्दल कुठलीही कागदोपत्री कार्यवाही केली नसल्याचे सांगितले.