कौतुकास्पद! हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान

नवी दिल्ली : देशात कोराना महामारीच्या संकटाचा फायदा घेत काहीजण जनतेची फसवणुक करताना दिसत आहेत. मात्र अनेकजण माणुसकीचं दर्शन घडवत चांगलं कामही करताना दिसत आहेेत. अशाच प्रकारे ओडीसा राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमधील मधुस्मिता प्रुस्टी या नर्स काम करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मधुस्मिता स्मशानात कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

मधुस्मिता कोलकातामधीलफोर्टिस हॉस्पिटलमध्ये पॅनडेमिक डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या. मधुस्मिता या 2011 पासून 2019 पर्यंत त्यांनी तिथो नोकरी केली. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मधुस्मिताचे पती हे काम करत होते मात्र त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्या माघारी आल्या आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करू लागल्या.

गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये जवळजवळ 300 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलं असल्याचं मधुस्मिता यांनी सांगितलं. महिला असूनही अंत्यसंस्कार करते म्हणून समाजाच्या टीकेचा सामनाही करावा लागला. पण त्या कधीही मागे हटल्या नाहीत. त्या प्रदीप सेवा ट्रस्ट अंतर्गत काम करतात. या ट्रस्टचं नाव तिच्या पतीच्या नावावर आहे.

Print Friendly, PDF & Email
Share