गोंदिया जिल्ह्यात फक्त 29 तर भंडारा जिल्ह्यात 83 नवे पॉझिटिव्ह

गोंदिया जिल्ह्यात 264 रुग्णांची कोरोनावर मात 

गोंदिया, दि.23 : आज रविवार, 23 मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार उपचारानंतर 264 रुग्णांनी कोरोनावर मात केली, 29 नवीन रुग्ण आढळले तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात 715 क्रियाशील रुग्ण आहेत. 

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 38776 रुग्ण बरे झाले आहेत. तालुकानिहाय ही संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया-20471, तिरोड़ा-3969, गोरेगाव-2055, आमगाव-3050, सालेकसा-1760, देवरी-2199, सड़क अर्जुनी-2195, अर्जुनी मोरगाव-2696 व जिल्हा बाहेरील-381 रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 40157 रुग्ण आढळले. तालुकानिहाय ही संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया-21015, तिरोड़ा-4044, गोरेगाव-2127, आमगाव-3165, सालेकसा-1939, देवरी-2333, सड़क अर्जुनी-2272, अर्जुनी मोरगाव-2852 व जिल्हा बाहेरील-410 रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 40157, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38776, क्रियाशील रुग्णांची संख्या 715 आहे. होमक्वारंटाईन 343 असून आतापर्यंत 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

भंडारा जिल्ह्यात आज 211 रुग्णांना डिस्चार्ज 

भंडारा, दि.23 : जिल्ह्यात आज 211 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55878 झाली असून आज 83 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57945 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे. 

आज 1181 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 83 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 76 हजार 703 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 57945 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. 
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 38, मोहाडी 06, तुमसर 09, पवनी 02, लाखनी 06, साकोली 13 व लाखांदुर तालुक्यातील 09 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 55878 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 57945 झाली असून 1025 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1042 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.80 टक्के एवढा आहे. 

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत. 

भंडारा कोरोना मुख्य बिन्दु 

  • आज 211 रुग्णांना डिस्चार्ज
  • कोरोना पॉझिटिव्ह 83
  • बरे झालेले रुग्ण 55878
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 57945
  • क्रियाशील रुग्ण 1025
  • आज 02 मृत्यू
  • एकूण मृत्यू 1042
  • रिकव्हरी रेट 96.43 टक्के
  • मृत्यू दर 01.80
  • आजच्या टेस्ट 1181
Print Friendly, PDF & Email
Share