देवरी येथे कोरोटे भवनात स्व.राजीव गांधी यांची पुण्यतिथि साजरी
देवरी, ता.२३: २१व्या शतकात भारत बळकर व स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविन्याचे स्वप्न स्व.राजीव गांधी यांचे होते. त्यांनी या अनुसंघाने देशात संगणक क्रांति व इंटरनेट चा प्रसार केला. पूर्वी २१ वर्षावरिल युवकांनाच मतदानाचा अधिकार होता. त्या अधिकारात संशोधन करुण १८ वर्षावरिल तरुणांना ही मतदानाचा हक्क बहाल केला. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात दहशतवाद आणि अतीरेकीपना सारख्या गंभीर आव्हानाला धुळकावित देशाच्या बळीकरी साठी काम केले. राजीव गांधी हे या देशाचे आधुनिक क्रांति व संगणक तंत्रज्ञानाचे जनक होते. अशा विकासात्मक विचारधारेचे स्व.राजीव गांधी हे खऱ्या अर्थाने आपल्या आधुनिक भारताचे करिष्मावादी नेते होते. असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनानुसार देवरी तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने देवरी येथे आमदार कोरोटे यांच्या भवनात शुक्रवार(ता.२१ मे) रोजी भारताचे माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या पुण्यतिथि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते. या प्रसंगी गोंदिया जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष रत्नदीप रहिवले, देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, माजी तालुका अध्यक्ष राधेश्याम बगड़ीया, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे, देवरी तालुका अध्यक्ष सुभद्राताई अगड़े, देवरी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शकील कुरैशी, देवरी तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी उपसरपंच परमजीत सिंग भाटिया, वरिष्ठ कार्यकर्ता नर्मदाप्रसाद शर्मा, शार्दूल संगीडवार, छगनलाल मुंगनकर, वामन वाड़गुरे, संजय बगड़े, राजेश गहाने. राजा भाटिया, राजा कोरोटे. नरेश राऊत, कमलेश पालीवाल यांच्या सह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ता यांनी उपस्थित राहून स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिस अभिवादन केले.
या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने देवरी येथील कोरोना उपचार केंद्रात उपचारार्थ दाखल रुगणांना फळ वाटप ही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया यांनी तर संचालन विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष नरेश राऊत यांनी आणि उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी मानले.