विश्वभान प्रतिष्ठानच्या अनोख्या उपक्रमात गडचिरोलीच्या संगीता ठलाल यांचे प्रेरणादायी मनोगत

कवियत्री संगीता ठलाल यांचे मनोगत

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक प्रहारTimes

विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या फेसबुक पेज वर दिनांक १७ अॉक्टोबर २०२० ते २५ अॉक्टोबर २०२० पर्यंत महिला सक्षमीकरणाचा हेतू डोळ्यासमोर समोर ठेवून ‘विश्व काव्य दुर्गा’ या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘व्हा व्यक्त,व्हा सशक्त’ अशी टॅग लाइन असलेल्या उपक्रमात देशातील महिलांबरोबर श्रुती दिवाडकर, दुबई येथून देखील ही महिला अगदी सहज सोशलमिडियावर व्यक्त झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींबरोबरीने अनेक क्षेत्रांत काम करत असलेल्या आणि गृहिणींनी देखील या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
सदर उपक्रमाचे उद्घाटन करताना व्हियेतनाम येथील प्रसिद्ध संगणकतज्ञ मिलिंद झेमसे म्हणाले,” कोरोना संक्रमण काळात महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी विश्वभान प्रतिष्ठानने अत्यंत सुंदर आणि उपयुक्त उपक्रम सुरू केला आहे. महिला सबलीकरणाचा नंदादीप तेवत ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे आणि प्रतिष्ठानच्या या उपक्रमात सहभागी व्हायला हवे.”
विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.जगदीश संसारे यांनी सदर उपक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर त्यांना बोलते करायला हवे. स्त्रीला बोलू देणे तिच्या सबलीकरणाच्या दृष्टीने उचललेले दमदार पाऊल आहे.
विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या फेसबुक पेज वर संपन्न झालेल्या कार्यक्रमात संपदा जोगळेकर, शर्वाणी पिल्लाई,अनघा देव, नमिता पाटील या मराठमोळ्या अभिनेत्रींनी तर हजेरी लावली विशेष म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री रावि शिंदे हिने देखील आपले मनोगत व्यक्त केले.
गडचिरोलीच्या संगीत ठलाल (कवयित्री) यांचे मनोगत सर्वार्थाने प्रेरणादायी ठरले.
रश्मी उंडे (संप्रेषक), तनुजा मुधोळकर (समाजसेविका), सई कुलकर्णी (नुत्यांगना, कलाकार), भाग्यश्री राऊ (ध्यानतज्ञ,समाजसेविका), मिलन राणे- सप्रे (लेखिका,कवयित्री), सतेजा राजवाडे (छायाचित्रकार, लेखिका),
दिपाली राणे (समाजसेविका), सोनल लोखंडे- काळे (वक्ता), डॉ. सीमा जोशी (होमिओपॅथी डॉक्टर), तेजल दवे (मानसशास्त्रज्ञ), अक्षता मुळे(गायिका), माधुरी भालेकर ,महर्षी दयानंद विदयलायतील प्रा.नीता खानविलकर (ह.भ.प. कीर्तनकार),दीप्ती शोभा (HR) स्वप्नगंधा भोगले ( विद्यार्थी)दिशा दिलीप कदम (समुपदेशक) योगिनी चव्हाण ( भरतनाट्य नर्तिका) जया मुंडे (प्राथमिक शिक्षिका) सोनाली पाटणे,साक्षी चौधरी (गायिका) वृषाली येलवे (गायिका) सविता इंगळे उर्फ सावी (स्त्रीवादी लेखिका,कवयित्री) शालिनी जाधव (समाजसेविका)
वृषाली सदावर्ते,रुपाली पाटील (लेखिका,चित्रकार,गजलाकार) सृष्टी मिश्रा (विद्यार्थी),अपेक्षा जवरे (विद्यार्थी), साक्षी बोंबले (विध्यार्थी) ,अनुपमा तवर (कवयित्री),शिल्पा जैन( लेखिका,कवयित्री,प्रवक्ता), हिरकणी राजश्री बोहरा(कवयित्री) ,प्रणाली भोसले (विद्यार्थी),विद्या जाधव(गृहिणी, विदयार्थी),पल्लवी ब्राम्हणकार (विद्यार्थी),सायली पाटील(नर्तिका),पुनम सुलाने(कवयित्री),प्रिती पाटील (कवयित्री)

२५ अॉक्टोबर २०२० रोजी सोनल लोखंडे यांनी मांडलेल्या ‘स्वामी विवेकानंद आणि स्त्री
या विषयाने उपक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे नेटके आयोजन आणि नियोजन विश्वभान प्रतिष्ठान,मुंबई यांच्या उपाध्यक्षा विंदा वीरकर आणि सचिव अश्विनी टिळक यांनी केले. त्यांनी सतत १५ दिवस अथक परिश्रम घेतले म्हणून समाजाच्या सर्वच स्तरातील महिलांपर्यंत सदर कार्यक्रम पोचू शकला. सर्व महिलांनी दोन्ही समन्वयिकांचे तोंडभरून कौतुक केले.सदर उपक्रम राबविण्याची संकल्पना विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांची शिलेदार आशिती जोईल यांनी मांडली.

Share