आठवडी बाजार मंगळवारपासून नियमित सुरू
अजिंक्य भांडारकर/ प्रहार टाईम्स
लाखनी ३०: कोरोना संक्रमणापासून आजतागायत आठवडी बाजारात प्रतिबंध करण्यात आले होते परंतु अन लॉक 5 च्या नियमानुसार नगरपंचायती क्षेत्रांना आठवडी बाजारा पासून सवलत मिळत आता लाखणी नगरपंचायत अंतर्गत असणाऱ्या आठवडी बाजार आता मुभा मिळाली आहे. बाजार पूर्वीच्या ठिकाणी भरेल याविषयी लाखनी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चिकनखुदे त्यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले आता आठवडी बाजारांना अन लॉक पाच नियमानुसार सुरू करण्यात येणार असून एक सामाजिक दुरतेचे पालन आणि जंतुनाशक रसायनांचा वापर करीत नागरिकांनी गर्दीचे ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नागरिकांनी आठवडी बाजारात जात असताना नाकाला मास सक्तीचे केले असून विना मास असणार्यांवर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी यावेळी सांगितले.