♦️गोंदिया जिल्ह्यात आज(21 मे) 500 रुग्णांची कोरोनावर मात.

?जिल्ह्यात 4 रुग्णांच्या मृत्यसह आढळले नवे 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया, (दि. 21 मे): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 21 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 500 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आजपर्यंत 40,023 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 37,886 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 1478 आहे. 917 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 659 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 94.66 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 151354 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 125679 नमुने निगेटिव्ह आले तर 20950 नमुने पॉझिटिव्ह आले. 1259 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 179732 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 159034 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 20698 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Share