गोंदिया जिल्ह्यात लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत
गोंदिया २९: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून उपरोक्त दिनांक 31.10.2020 पर्यंतच्या लॉकडाऊन संदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने या कार्यालयाचे उपरोक्त अन्वये गोंदिया जिल्ह्याकरीता आदेश निर्गमीत करण्यात आले आहे . तसेच शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे या स्तरावर वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहे . महाराष्ट्र शासनाने दिनांक 31.10.2020 पर्यंतच्या लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक 30/11/2020 पर्यंत वाढ केली आहे . म्हणुन प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग दीपक कुमार मीना , अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , गोंदिया यांच्या आदेशाद्वारे जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी 30/11/2020 पर्यंत वाढ करण्यात येत आहे . तसेच उपरोक्त संदर्भीय आदेशांमध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणेसह निबंधीत बाबी वगळून इतर उपक्रम अटी व शर्तीसह सुरू राहतील . उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधीत व्यक्ती तसेच आस्थापना यांचेवर भारतीय दंड संहिता 1860 ( 45 ) याच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल .