तुमचं SBI बँकेमध्ये काम आहे?, तर ही बातमी नक्की वाचा; बँकेने लागू केले नवीन नियम

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी आता बँकेच्या कामकाजाचे नवे नियम लागू केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने निवेदन जारी करून नव्या नियमांची माहिती दिली आहे. नवे नियम हे 31 मे 2021 पर्यंत लागु असणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व शाखांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता बँक विशिष्ट कालावधीसाठीच सुरू राहणार असून फक्त अत्यंत महत्त्वाची कामचं केली जाणार आहेत. त्याबरोबरच बँक निवडक काम पूर्णत्वास नेणार आहे.

बँकेच्या ग्राहकांनी केवळ महत्त्वाच्या कामांसाठी बँकेच्या शाखेत यावं त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी बँकेमध्ये भेट देऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सुरू राहणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याच समजतंय.

सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा सुरू राहणार असून 2 नंतर बँक पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच अत्यंत महत्त्वाची कामे बँकेमध्ये केली जाणार असून लोकांनी विनाकारण बँकेत गर्दी करू नये तसेच आवश्यक काम नसल्यास बँकेतर्फे ते काम करण्यात येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासंबंधी निवेदन जारी करून ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने माहिती दिली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें