“केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत”

वृत्तसंस्था
मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भरघोस मदत केली, व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले, ऑक्सिजन दिला, मात्र आघाडीचे नेते त्याचा उपयोग करण्याऐवजी कांगावा करत आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे, असं आमचं आव्हान असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केली. व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले परंतु या सरकारने व्हेंटिलेटर उघडूनच बघितले नाहीत. त्यामुळे अनेक व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी राहिल्या. ही मशीन आहे चार-चार महिने पडून राहत असेल तर यामध्ये काही दोष येऊ शकतात?, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सचिन सावंत यांनी दिलेल्या आव्हानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/sachin_inc/status/1394588997528129543?s=21

Share