स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय आता कोविन अॅपवर : लसीचे बुकींग सुरु
प्रहार टाईम्स
वृत्तसंस्था– देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. बाधितांची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लसीकरणाचा वेग वाढविला. काही दिवसामध्ये ही गती खूप मंदावली. लसीचा तुटवडा निर्माण झाला. तर भारतात सिरमची कोव्हीशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जात होत्या आता सरकारने तिसरी लस म्हणजे स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसीला देखील परवानगी दिली आहे. या लशींच्या २ खेप भारतात आयात झाल्या आहेत. रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजच्या सदस्याने घेतली. तसेच Sputnik V लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला आहे. म्हणून आता लोकांना ३ पर्याय उपलब्ध असणार आहेत.
रशियामधून Sputnik V लसीचा पहिला साठा हा १ मे रोजी भारतात आला आहे. तसेच स्थानिक औषध प्रशासनाकडून (Local drug administration) त्याला १३ मे रोजी संमती देण्यात आली आहे. तर आगामी काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. त्यादरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्याद्वारे या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे देखील समोर आपले आहे.
तर आता कोविन अॅपवरून स्लॉट बुक करताना PINCODE टाकून पर्याय सर्च करायचा आहे. Sputnik V लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी संबंधित रुग्णालयांची लिस्ट पुढं येणार आहे. Sputnik V लसीचा १ डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर ५ % GST आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण दर ९९५ रुपये ४० पैसे एवढा असणार आहे. असे कंपनीने सांगितले आहे. म्हणून रशियन बनावटीची लस भारतात जवळपास हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.