लवकरच कोरोनावर मिळणार नोझल स्प्रे व्हॅक्सिन; ‘या’ 5 नोझल स्प्रे’ व्हॅक्सिनच्या चाचण्या सध्या सुरु…

कोरोनाचा कहर वाढत असताना लसीकरण मोहीम (Vaccination) ही वेगाने सुरू आहे आणि तसे दिलासादायक आकडेही आपल्याला दिसत आहेत. देशात 18 कोटींहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. सध्या भारतात दोन स्वदेशी लसींशिवाय, रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ची दुसरी खेपदेखील भारतात आली आहे. लसदेखील आली आहे. दरम्यान, Nasal Spray Covid Vaccine वरही काम सुरू आहे.

‘या’ 5 लसीवर काम अद्याप सुरू..

नाकाद्वारे दिली जाणारी व्हॅक्सिन (Nasal Spray) कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी एक मोठे शस्त्र सिद्ध होईल, असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्याचसोबत या लसीचा फक्त एकच डोस प्रभावी असू शकतो, परंतु ही लस कधी येईल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

WHO ने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 5 Nasal Spray Covid Vaccine वर काम सुरू आहे. भारत,अमेरिका, यूके, चीन या देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.

‘नाकातून देण्यात येणारे नोझल स्प्रे’ चे फायदे…

तज्ञ-जाणकारांच्या मते, नाकातून देण्यात येणारे नोझल स्प्रे कोरोनाविरूद्धच्या लढ्यात गेम चेंजर ठरु शकते, कोविड लस म्हणूनही अधिक परिणामकारक ठरेल. यामुळे ट्रान्समिशन साखळी खंडित होईल. श्वसन संसर्गाचा धोका देखील कमी होईल. या स्प्रेचा वापर मुलांसाठी देखील करण्यात येऊ शकतो.

‘त्या’ 5 लसी कोणत्या…?

▪️ सीरम इन्स्टिट्यूट

कोडाजेनिक्स (Codagenix) ही अमेरिकन कंपनी पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (SII) च्या संयुक्त विद्यमाने ‘इंट्रानोझल व्हॅक्सिन’ COVI-VAC वर काम करत आहे. ही देखील सिंगल डोस लस आहे.

▪️ भारत बायोटेक

भारत बायोटेक कंपनी नोझल स्प्रे लसीवर काम करत आहे. डिसेंबरपर्यंत या लसीचे 10 कोटी डोस तयार होतील, असा अंदाज आहे. या लसीची वैद्यकीय (Clinical) चाचणी सुरू आहे.

▪️ अल्टीम्यून

अ‍ॅडकोव्हीड (AdCOVID) नावाची लस अल्टीम्यून (Altimmune) ही अमेरिकन कंपनी तयार करत आहे. जी नाकाद्वारे दिली जाईल. ही लस क्लिनिकल चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे.

▪️ सॅनोटाइज

कॅनडामधील सॅनोटाइज (SANOtize) कंपनीचा ब्रिटनमध्ये चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे. प्रयोगशाळेत हा स्प्रे सर्व प्रकारच्या विषाणू विरोधात प्रभावशाली ठरला आहे. याचे ॲन्टीवायरल स्पेक्ट्रम सर्व प्रकारच्या विषाणूंचा खात्मा करतात. नाकासाठी हा सॅनिटायझर सारखं काम करेल. आता कंपनी भारतात प्रवेशासाठी प्रयत्न चालू आहेत, अशी माहीती आहे.

▪️रोकोटे लॅबोरेटरीज

फिनलँड देशातील रोकोट लॅबोरेटरीज ही कंपनीदेखील देखील कोरोनावरच्या नोझल लसींवर काम करत आहेत.

Share