कोरोंनात आयुर्वेदाची महत्वाची भूमिका- निमा अध्यक्ष डॉ. निंबार्ते

आयएएम चा निषेध

तुषार हर्षे/ तालुक़ा प्रतिनिधी
लाखनी 29:
जगातील सर्वात प्राचीन आयुर्वेद चिकित्सा पद्धती असून भारतीय चिकित्सा पद्धती मानवी जीवनशैलीशी निगडित असल्याने अत्यंत महत्त्वाची आहे. या शास्त्रानुसार नुसार स्वास्थस स्वास्थ रक्षणम, आतुरस्य विकार प्रश्नमच. या उद्देशानुसार जीवनातील सुखायु आणि दीर्घायु आयुष्य प्राप्त करण्यासाठी देशातील सर्व जनतेत आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे सध्या परिस्थितीतील कोविड -१९ वैश्विक महामारी देशांमध्ये नियंत्रित करण्यासाठी भारतीय पद्धती अर्थात आयुर्वेदाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याची समप्रमाण नोंद देशभरात केली गेली आहे विशेष ज्ञान नसलेल्या व्यक्तीच्या वक्तव्यावरून आयुर्वेद हे अशास्त्रीय सिद्ध होऊ शकत नाही देशाचे गौरवपूर्ण चिकित्सा पद्धती मुळे आयुर्वेदाने राष्ट्रीय आरोग्य संकटात महत्त्वपूर्ण आणि यशस्वी भूमिका बजावल्याचे सिद्ध झाल्यानंतर इतर कुणीही आयुर्वेदाला प्रमाणपत्र देण्याची गरज उरत नाही म्हणून आयुर्वेद स्वयं सिद्ध आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने देशातील जनसामान्यांच्या जीवनपद्धतीला अनुकूल अशी आहार-विहार पद्धती तसेच आयुष काढा यांच्या वापर करण्यासाठी संबोधित केले त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे देशातील कोविड -१९ या वैश्विक महामारी तीव्रता खूप कमी होत आहे. यावरून स्पष्ट होते की आयुर्वेदिक औषधी द्वारा जनसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. जागतिक महामारीच्या नियंत्रणात भारतीय चिकित्सा पद्धतीने महत्वाची भूमिका पार पडली. आयुर्वेदिक औषधी द्रव्यांचे उपयोगामुळे आलेले चांगले परिणाम त्याप्रमाणे परिणामांचे समर्थन आणि संपूर्ण समाधान झाल्यानंतर भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड -१९ या महामारीच्या रुग्णांमध्ये आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा उपयोग त्याची संमती जाहीर केली. ते भारतीय जनतेच्या स्वास्थ्यरक्षणासाठी तसेच उपचारासाठी एक अनुकूल प्रश्न आणि न्यायोचित पाऊल म्हणता येईल. त्यामुळे एका राष्ट्रीय जबाबदार संघटना म्हणून निमा द्वारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या यांचे जनसामान्यांच्या जीवन रक्षणासाठी आयुर्वेदाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तसेच देशाच्या हितामध्ये उपयोगी चिकित्सा पद्धती म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा वापर करण्याबद्दलच्या या अभिनंदन करीत आहे. देशातील सर्व चिकित्सा पद्धतीवर एकाधिकारशाहीला त्यासारखे बांधणारी एक संघटना निष्कारण मनात विद्वेषाची भावना ठेवून देशाची गौरवपूर्ण चिकित्सापद्धतीत आयुर्वेदाला विकासापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसते येत असल्याचा आरोप निमा संघटणेद्वारा पत्रकार परिषदेत करण्यात आला. वैश्विक संकटामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा प्रोटॉकल जाहीर करण्यात आला व वैज्ञानिकांनी असंविधानिक म्हणणे हे अत्यंत निंदनीय असून स्वतःचा मोठेपणा मिळण्यासारखे आहे याच्या जाहीर निषेध आमची राष्ट्रीय संघटना अत्यंत प्रखर शब्दांमध्ये करीत असून त्या सबंधीचे पत्र आयएएम या संघटनेला पाठवीत असल्याचे डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जिल्हा अध्यक्ष, निमा यांनी पत्रकार परिषदेत संगितले यावेळी डॉ. दिलीप फरांडे, डॉ. केशव कापगते, डॉ. अमित जवंजार, डॉ. राजेश चंदवाणी, डॉ. गणेश मोटघरे, डॉ. नितिन गुप्ता, डॉ. दिलीप पवार, डॉ. नितिन देशपांडे, डॉ. टिकेश्वर करंजेकर, डॉ. रवी हलमारे उपस्थित होते.

Share