विदर्भ कोकण ग्रामीण बैंक मधे आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन
प्रहार टाईम्स प्रतिनिधी
देवरी २९ : विदर्भ कोकण ग्रामीण बँक देवरी येथे आज दिनांक 29/10/2020 रोजी आर्थिक साक्षरता शिबिराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व कर्मचारी आणि शाखेचे प्रमुख मुकुंद देहनकर यांनी शपथ घेतली आणि ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक साक्षरता शिबिराचे महत्त्व पटवून दिले.
या वेळी बैंक व्यवहार कसे करावे आणि बैंक मार्फ़त राबविलेल्या योजनेचा लाभ कसा घ्यावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक अंतर राखुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.