खबरदार विना हेल्मेट मोटर सायकल चालविली तर…!

भंडारा पोलिस अधिक्षकांचे पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आदेश

भंडारा 28 – जिल्हात मोटर सायकलचे अपघात दिवशेंदिवस वाढत असून त्यामध्ये मृत्युचे कारण डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे मा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने बिनतारी संदेश जाहीर करण्यात आलेला आहे. या संदेशामध्ये सर्व ठाणे प्रभारी , सर्व शाखा प्रमुख , नियंत्रण कक्ष अधिकारी रा . पो . नी पोलिस मुख्यालय भंडारा यांच्या अधिनस्त पोलिस अधिकारी व पोलिस अमलदार यांनी मोटर सायकल ने प्रवास करतांना हेल्मेट घातल्याशिवाय प्रवास न करण्याबाबत आपल्या स्तरावर सक्त निर्देश निर्गमित करण्यात यावे व कुणी आदेशाचे पालन करीत नसल्यास व वाहनाचा विमा नसल्यास असे आढळून आल्यास कुठलीही हयगय न करता दि. 01-11-2020 पासून मोवाका नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश पोलिस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात आलेले आहे.

Share