आमदार कोरोटे यांच्याकडून चिचगड रुग्णालय व घोनाड़ी आरोग्य केन्द्राची पाहणी
आरोग्य सेवा सुरळीत ठेवनण्याचे व रिक्त पद त्वरित भरण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश.
देवरी 6: कोरोना विषानुचा संसर्ग सतत वाढत आहे. त्यामुळे आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील रुग्णालय व प्राथमीक आरोग्य केन्द्रावर लोकांना आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळावी या हेतुने आमदार सहषराम कोरोटे हे नियमीत विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक आरोग्य केंद्र व रुग्णालयात भेट देवुन पाहणी करतात. या अनुसंघाने देवरी तालुक्यातील चिचगड येथील ग्रामीण रुग्णालय येथे मंगळवारी(ता.४ मे) रोजी आणि बुधवारी(ता.५ मे) रोजी घोनाड़ी येथील प्राथमीक आरोग्य केन्द्रावर भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली व आरोग्य सेवेचा आढावा घेतला आणि आरोग्य सेवा सुरळीत ठेवन्याचे निर्देश दिले.
यात सविस्तर असे की, आमदार सहषराम कोरोटे यांनी चिचगड येथील ग्रामीण रुग्णालय व घोनाड़ी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राची भेट देवुन पाहणी केली व आरोग्य व्यवस्थे बाबद आढावा घेतला. सोबतच चिचगड व घोनाड़ी परिसरातील लोकांना कोरोना आजारा विषयी मोठ्या प्रमाणात जागृत करुण लसीकरणाचा टप्पा पूर्ण करून आरोग्य सेवा सुरळीत ठेवन्याचे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे डेप्यूटेशन वर बाहेर गेलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत चिचगड व घोनाड़ी येथे बोलवीण्याचे व चिचगड आणि घोनाड़ी येथील रिक्त पद त्वरित भरण्याचे सूचना आरोग्य विभागाचे उपसंचालक श्री. जायस्वाल, गोंदिया जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी, गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सक व गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भ्रमनध्वनी वरुण दिले.
यावेळी आमदार कोरोटे यांच्या सोबत चिचगड व घोनाड़ी येथे चिचगड चे वैद्यकीय अधीक्षक गिरीश भोंगाड़े, घोनाडीचे वैद्यकीय अधिकारी अश्विनी डभारे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दिलीप परिहार, घसरन धरमगुडे, भुवन नरवरे, बंदे अली, सिद्धार्थ टोलाचे सरपंच सोनू नेताम, ग्राम पंचायत सदस्य साईन सय्यद यांच्या सह इतर कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.