गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटून शिक्षकाने केला मुलीचा वाढदिवस

प्रहार टाईम्स : बंधारपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील आदिवासी गावात मुलीच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला. श्री विशाल संतोष चंदनखेडे पदवीधर प्राथमिक शिक्षक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांची मुलगी ओवी विशाल चंदनखेडे तिच्या वाढदिवसानिमित्त बंधारपाडा येथील बेघर , निराधार, दाव्या बुसाऱ्या गावित ,गीब्या दाजी गावित, जेंता विजा गावित या खऱ्या गराजुला तादुळ ,गहू, तेल, तिखट, हळद, साबण, चादर , टॉवेल, लाईट वायर पिन, मास्क, इत्यादी जीवन आवश्यक वस्तू देवून ओवीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.श्री. विशाल संतोष चंदनखेडे यांना आदिवासी विकास विभागामार्फत खावटी अनुदान योजनेअंतर्गत बंधारपाडा ला काम केले होते. त्यात गीब्या दाजी गावित, जेंता विजा गावित यांच्याकडे कुढलेच कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचे फॉर्म खावटी अनुदान योजना भरता आले नाही. व त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व स्वतःचे घर ही नसल्यामुळे मिळेल तिथे वस्ती करून राहतात. त्यांचे या जगात कोणीच नसल्यामुळे व शिक्षणाअभावी त्यांच्याकडे कुठलीच कागदपत्र नाही. त्यामुळे त्यांना रेशन कार्ड घरकुल आधार कार्ड बँक खाते या कुठल्याच शासकिय गोष्टीचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे श्री विशाल संतोष चंदनखेडे त्यांचे आधार कार्ड बँक खाते काढण्याकरिता मदत करीत आहे. जेणेकरून शासनामार्फत येणाऱ्या विविध योजनेचा त्यांना लाभ मिळून या निराधारांना आधार मिळेल .

Print Friendly, PDF & Email
Share