कोरोनावर ‘गुडवेल/ गिलोय’ ठरतेय अमृत !
ग्रामीण आणि शहरी भागात या वनस्पतीला मोठी मागणी
संकलन – डॉ. सुजित टेटे
गुडवेल चे बहुगुणी फायदे असून प्रतिकारशक्ति वाढते . ताप कमी होतो , मलेरिया , टायफाईड , आजारावर गुणकारी , पोटाच्या समस्यावर गुणकारी , दम खोकला , कफ आदि कमी होतो. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होते. आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे स्थान या वनस्पतीला दिलेले आहे. जाणून घ्या सविस्तर …….
देवरी– राज्यात आणि जिल्हात सध्या करोना च प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून ग्रामीण आणि शहरी भागात गुडवेल या वनस्पतीची मागणी मोठ्याप्रमाणात वाढलेली बघावयास मिळत आहे. गुडवेल ही वनस्पति शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यास उपयुक्त असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबियांनी गुडवेलचा रस घेण्यास पसंती दिली आहे. गुळवेल ल आयुर्वेदात मोठे स्थान असून अनेक जाणकारांच्या मते गुडवेल अनेक आजारांवर अमृत ठरत असल्याचे मत व्यक्त केलेले आहे.
गुडवेलचा रस सेवन केल्याने ताप , सर्दी , खोकला , डोकेदुखी , मळमळ , मूळव्याध , सांधेदुखी , मधुमेह आटोक्यात येतो असे सांगण्यात येते. त्यामुळे डेंगू , चिकनगुणिया व स्वाइन फ्लू आजारावर गुडवेल गुणकारी आणि रामबाण असल्याचे व्यक्त करण्यात येत असून शहरी भागातही या वनस्पतीला मागणी वाढलेली दिसून येत आहे.
ग्रामीण भागात कडूनिबांच्या व आंब्याच्या झाडावर गुडवेल ही वनस्पति मोठ्या प्रमाणात वडलेली दिसून येते. या वेळीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे. कोरोना संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंब गुडवेलचा रसकाढा आदि सेवन करीत आहेत. काही कुटुंब वेळचे लहान लहान तुकडे करून रात्री पाण्यात शिजवून ठेवतात आणि सकाळी उपाशी पोती त्याचे सेवन करतात. काही कुटुंब गुडवेल ल पाण्यात उकडून त्यामध्ये लवंग , काळीमिर्च, सेंधा मीठ आदि खालून त्याचा काढा करून सेवन करतात. गुडवेल ल आयुर्वेदात मोठे महत्व असून गुडवेल एक रामबाण औषधी म्हणून ओळख आहे.