सुखद बातमी: गोंदिया जिल्ह्यात विक्रमी 924 रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात पुन्हा 16 मृत्यूसह  आढळले 548 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

      गोंदिया, (दि. 30 एप्रिल) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 30 एप्रिल रोजी प्राप्त अहवालात  विक्रमी 924 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात नवे 548 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

        आजपर्यंत 33034 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 26924 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 5571  आहे. 4153 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 539 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 81.50 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 22.54 दिवस आहे.  

जिल्ह्यातील 924 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. 
तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. 

       जिल्ह्यात आज 548 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. 

जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयात खालील प्रमाणे बेड्स(खाटांची) उपलब्धता आहे.

जिल्ह्यात लसीकरण खालील ठिकाणी होत आहे त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील खालील 6 खाजगी दवाखान्यात देखील लसीकरण होत आहे ज्यामध्ये प्रत्येकी 250 रु. प्रति लाभार्थी घेण्यात येत आहे..

जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन ची संख्या 63 असून व त्यामधील कोरोना बाधित रुग्ण तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे-

कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएसद्वारे कळविण्यात येतो.

Share