भंडारा जिल्ह्यात तयार होणार 5 ऑक्सीजन काँसेंट्रेटर प्लांट – नाना पटोले

  • साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, पवनी या ठिकाणी हे ऑक्सिजन काँसेंट्रेटर प्लांट तयार होणार.
  • पाचही ऑक्सिजन प्लांट कायमस्वरूपी जिल्ह्याच्या सेवेत राहतील उपलब्ध.

https://www.facebook.com/674249472964982/posts/1641655656224354/?d=n

https://twitter.com/nana_patole/status/1387321994752921603?s=21

भंडारा/गोंदिया : 29– सध्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहिल्या वेळी पेक्षा यावेळी होत असलेला प्रादुर्भाव हा वेगाने आणि जास्त धोक्याचा होताना दिसतोय.यातच अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे , आणि रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवडा निर्माण होत आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी जिल्ह्यात पाच ऑक्सिजन काँसेंट्रेटर प्लांट तयार करन्यात येत असल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आहे.

त्यामध्ये साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर आणि पवनी या ठिकाणी हे ऑक्सिजन काँसेंट्रेटर प्लांट तयार होत असून हे सर्व पाचही ऑक्सिजन प्लांट कायमस्वरूपी जिल्ह्याच्या सेवेत राहतील. येत्या काही दिवसातच त्यांचा वापर करण्यास सुरुवात होईल आणि यामुळे ऑक्सिजनच्या तुटवडा देखील भासणार नाही. तसेच हे ऑक्सीजन प्लांट कायमस्वरूपी असल्यामुळे भविष्यात देखील याचा फायदा जिल्ह्याला निश्चितच होईल असे त्यांनी सांगितले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share