दिलाशादायक: गोंदिया जिल्ह्यात आज 759 रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात 14 मृत्यूसह आढळले 476 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

डॉ. सुजित टेटे

गोंदिया 28: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 28 एप्रिल रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 476 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 759 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आजपर्यंत 31912 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 25480 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 5922 आहे. 4318 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 510 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 78.64 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 22.54 दिवस आहे.

जिल्ह्यातील 759 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे

जिल्ह्यात आज 476 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे

जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयात खालील प्रमाणे बेड्स(खाटांची) उपलब्धता आहे.

जिल्ह्यात लसीकरण खालील ठिकाणी होत आहे त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील खलील 6 खाजगी दवाखान्यात देखील लसीकरण होत आहे ज्यामध्ये प्रत्येकी 250 रु. प्रति लाभार्थी घेण्यात येत आहे..

जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन ची संख्या 63 असून व त्यामधील कोरोना बाधित रुग्ण तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे-

होम आयसोलेसन च्या प्रोसिजर करिता (CCC) कोविड केअर सेन्टर, आदिवासी बॉईज हॉस्टेल, मूर्री येथे संपर्क करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी केले आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 131666नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 106529 नमुने निगेटिव्ह आले तर 15818 नमुने पॉझिटिव्ह आले. 6004 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 131953 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 114028 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 17925 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. 

कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएसद्वारे कळविण्यात येतो.

Share