शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा: जियालाल पंधरे

योगेश कावळे / तालुका प्रतिनिधी

सालेकसा 24 :

खरीप हंगामातील हलक्या प्रतिचे धानपिक निघाले असून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे. आधीच कोरोना माहामारीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शेतकऱ्यांची अस्मानी संकटामुळे आर्थीक पिळवणूक झाली आहे. ही शेतकऱ्यांची आर्थीक पिळवणूक थांबवण्यासाठी त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील हलके मध्यम व जड या तीन प्रतीच्या धान पिकाची लागवड केली जाते. दिवाळी सणापूर्वीपासून हलक्या धानाची कापणी व बांधणीचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांची धानाची कापणी व बांधणीचे काम आटोपले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी बांधणी करुन पुंजने टाकले . मळणी नंतर हलक्या धानाची शेतकरी विक्री होत असते सध्या हलक्या धानाची मळणी सुरू झाली आहे. पुढे दिवाळी असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. असे असले तरी खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यासाठी अजून पर्यंत शासनाने शासकीय आधारभूत खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थीक पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नसल्याने तात्काळ जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात ठाणा, गोरठा, वळद, काळीमाटी, तिगाव, आमगाव, अंजोरा व सुपलीपार या ठीकाणी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे.

Share