
गोंदिया 24:(जिमाका)अहवालानुसार नव्याने आणखी 85 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.उपचार घेत असलेल्या 120 बाधितांनी कोरोनावर मात केली.गोंदिया येथील 83 वर्षीय रुग्णाचा गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
आज नवीन 85 कोरोना बाधित रुग्ण आढळले. ती रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -43, तिरोडा तालुका -00, गोरेगाव तालुका -04,आमगाव तालुका-09, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका- 11, सडक/अर्जुनी तालुका -04, अर्जुनी/मोरगाव तालुका -10 आणि इतर राज्य/बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्ण आढळून आले.








