नक्षल्यांनी केली मेडपल्ली ते तुमरडा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ

वृत्तसंस्था
अहेरी :
एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी लढत असतांना मात्र गडचिरोली जिल्हयात नक्षल्यांचे कृत्य कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. नक्षल्यानी पुन्हा डोके वर काढत आपले कृत्य सुरू केले असून अहेरी पासून अंदाजे २७ किमी अंतरावर असलेल्या मेडपल्ली ते तुमरडा रस्ता कामावरील वाहनांची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना आज २६ एप्रिल २०२१ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.


प्राप्त माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील मेडपल्ली ते तुमरडा मार्गावर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. सदर कामावर असलेल्या वाहनांची नक्षल्यांनी जाळपोळ केली असून यात२ पाणी टॅंकर, ३ टॅक्टर व १ जोहन डिअर ट्रॅक्टरचा समावेश आहे. तसेच घटनास्थळी बॅनर व पत्रके आढळून आली आहे यात ‘समाधान’ नावाने सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतिकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या ‘प्रहार दमन अभियानाच्या’ विरोधात एप्रिल २०२१ या महिनाभर ‘प्रचार आणि जनआंदोलन उभे करा! असा उल्लेख करत २६ एप्रिल रोजी या दमन मोहीमेच्या विरोधात भारत बंद करा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युवक,युवतींनो, नवजनवादी भारत निर्माण करण्याकरिता पीएलजीए मध्ये भर्ती व्हा, शेतकरी, कामगार आदिवासी, दलित,महिला, बुध्दीजीवींचे संघर्ष जिंदाबाद !, नवजनवादी क्रांती जिंदाबाद ! असा नारा पत्रकातून पश्चिम सब जोनल ब्युरो गडचिरोली भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share