वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदीकरिता दिलेल्या निधिच्या खर्चास त्वरित प्रशासकीय मान्यता द्या- आ.कोरोटे
देवरी २४: देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील आरोग्य सेवा बळकट करुण कोरोना विरुद्ध लढण्याकरिता विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्याकरिता आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये देत आहो. या निधिच्या खर्चास प्रशासकीय मान्यता त्वरित प्रदान करुण सदरनिधी जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांना उपलब्ध करुण देण्याबाबद आमदार सहषराम कोरोटे यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी(ता. २३एप्रिल) रोजी पत्र देवुन मागणी केली आहे.
आमदार कोरोटे यांच्या मतानुसार कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे माझ्या विधानसभा क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. करीता विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा या तालुक्यातील आरोग्य सेवा बळकर करुण येथील लोकांचे चांगल्या प्रकारे उपचार व्हावे या करिता सर्व ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य यात ऑक्सीजन कान्सन्ट्रेटर व व्हायटल साईन मॉनिटर वितरण करण्याकरिता माझ्या आमदार स्थानिक विकास निधितून एक कोटी रूपयाच्या निधिला खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करुण सदर निधि जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांना उपलब्ध करुण देण्याबाबद म्हटले आहे.
या आशयचे पत्र आमदार सहषराम कोरोटे यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी यांना देवुन त्वरित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली आहे.