कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे देवरीवासी संतापले

वोल्टेजच्या लपंडावामुळे पंखे , कूलर , टीव्ही आदी उपकरणांचे नुकसान

प्रा.डॉ. सुजित टेटे

देवरी 24: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उन्हाळ्यात संचारबंदीमुळे कुटुंब घरात कैद झाल्याने विजेच्या उपकरणांचा वापर जास्त वाढला असतानाच देवरी शहरामध्ये विजेच्या दाबाची मोठी समस्या निर्माण झाली असून इलेक्ट्रिक उपकाराचे मोठे नुकसान होत असल्याने नागरिक संतापल्याचे वृत्त आहे.

वाढलेले बिल आणि आता कमी वोल्टेज ची समस्या लोकांना परवडणारी नसून लॉकडाउनच्या काळात जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. एकी कडे वीज वितरण कंपनी 1 एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ केली आहे. महावितरणकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. वीज नियामक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे आता 1 एप्रिलनंतर येणारी वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्याच बरोबर पंखे , कूलर व्यवस्थित चालत असून कमी वीज दाबामुळे उपकरणे मोठ्या प्रमाणात बिघडत असल्याचे लोकांच्या तक्रारी समोर येत आहेत.

विजेच्या कमी दाबाची समस्या तात्काळ सोडवावी आणि उन्हाच्या तडाख्यात कूलर पंख्यांना गती देऊन लोकांचा तापलेला माथा वीजवितरण कंपनीने प्रथम प्राधान्य देऊन सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

विजेची गरज सर्वांना आहे उद्योग क्षेत्र , कृषी क्षेत्र , आणि घरगुती उपयोगातील कुलर , पंखे , AC आदी उपकरणे अचानक सुरु झाले, तालुक्यात रब्बीच्या पिकाला पाणी आवश्यक आहे त्यामुळे कमी दाबाची समस्या निर्माण झालेली आहे. समस्या लवकर सोडविली जाईल.

देवरी तालुक्यात मागील 2-3 वर्षापासून 132kv चा पॉवर हाऊस मंजूर झाला आहे परंतु ग्रीन झोन आणि रिझर्व्ह फॉरेस्ट असल्यामुळे प्लांट साठी जागा मिळत नाही आहे.”

सरोज परिहार ( अभियंता , महावितरण , देवरी )
Print Friendly, PDF & Email
Share